Friday, 8 July 2016

“थेंब आनंदाचे (पाऊस आला)” - A Poem by Ronak Sawant...


आले ते थेंब, आला आनंद
हो आला, पाऊस आला
चेहऱ्यावर आले हस्य परत, तर मन झाले उदंड
कारण आला आपला लाडका, पाऊस आला.

यंदा आम्हा-सगळयांना फार उत्सुकता होती तुझी पाऊसा,
कारण दुष्काळामुळे सर्वांचा घरी आलेला वळसा.
आखेर तु आलास,
नि सगळयांना चिंब भिजवू लागलास.

ह्या सुखलेल्या नदयांना आता तुझ्यामुळे पूर येईल,
हे सुखलेले झाडे पानांने, फळांने व फुलांने भरून येतील,
सृष्टी हिरव्या रंगाने रंगून जाईल,
मोर वना-वनात थुई थुई नाचू लागतील.

हा सर्व निसर्ग सुंदर दिसेल,
बळीराजाच्या बळाला आता यश मिळेल.
हे सर्व काही आभाळातून कोसलणाऱ्या तुझ्या ह्या थेंबांचे कमाल,
तर रिम-झिम पडणाऱ्या तुझ्या ह्या सरींची धमाल.

काही लोकं मनसोक्त भिजून तुझा आनंद घेतात,
तर काही लोकं पावसात नाचून व खेळून प्रफुल्लित होतात.
काही लोकं भजी व टपरीवरची चहा मित्रांसोबत घेऊन मजा करतात,
तर काही लोकं घरबसल्या परिवारासोबत गाणी ऐकून पावसा तुझा स्वागत करतात.

सर्वांना आपला वाटणारा तू,
जेव्हा गेल्या काही वर्षात गेलास निघून,
फार वाईट वाटलं मनाला तर कधी आले रडू,
आमच्याकडून काही चूक झाली असेल तर मोठ्या मनाने माफ टाक करून.

तुझ्या थेंबाने मन होते ताजेतवाने,
तर तुझ्या थेंबाने आठवतात ती बालपणाची पावसाळ्यातील आठवणे.
तुझ्या थेंबाने मन होते प्रसन्न,
तर तुझ्या थेंबाने बदलते हे जीवन.

तुझ्या थेंबात आहे दिलासा,
तर तुझ्या थेंबात आहे काही तरी खास,
तुझ्या थेंबात आहे जलसा,
तर तुझ्या प्रत्येक थेंबात आहे आनंद वाटण्याचे ध्यास.

ही ठंड गार हवा,
तर हा मातीचा गंध,
किती अनोखा आहे ना,
हा पावसाचा आनंद.

असाच येत जा नेहमी पावसा,
आणि असाच आपल्या थेंबाने सर्वांना आनंद वाटत राह.
कारण, तु आम्हाला हवा आहेस,
तु आम्हाला हवा आहेस.


कवी - रोनक सावंत

No comments:

Post a Comment